📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लाचखोर शिक्षणाधिकारी ‘वैशाली वीर-झनकर’ फरार!

मालेगाव (जय योगेश पगारे)
जिल्ह्यातील वरिष्ठ शिक्षण अधिकारी लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले होते, त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्यांमध्ये रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र काही तासातच फरार झाल्याने नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे, इतका गंभीर गुन्हा असतांना घरी का जाऊ दिले? हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे, 
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर ( झनकर ) फरार तर चालक ज्ञानेश्वर येवले प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना 13 ऑगस्ट पर्यन्त पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर ( झनकर ) फरार असून त्त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील शोध घेत आहेत.

रात्री उशीरा पर्यंत तिघांची कसून चौकशी करण्यात आली, नंतर लाचखोर महिला शिक्षणधिकरी घरी गेल्या होत्या त्यानंतर, सकाळी साडेआठ वाजता न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र या आदेशांना न जुमानता वैशाली वीर गैरहजर राहिल्या. असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

काल नाशिक येथील एका शिक्षण संस्थेकडून आठ  लाखांची लाच घेतल्याप्रकरणी, वैशाली वीर यांच्यासह शिक्षक पंकज दशपुते व वाहनचालक ज्ञानेश्वर येवलेवर गुन्हा दाखल करण्यात आला
जिल्हा न्यायालयात वाहनचालक तसेच शिक्षक या दोघांना हजर करण्यात आले.

सदर प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांनी 9 लाखाची मागणी केली होती मात्र 8 लाखात हा सौदा करण्यात आला होता. अजून काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून यांच्या विरोधात अजूनही काही तक्रारी असल्यास तक्रार करण्याचे आवाहन यावेळी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने