📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सात हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले..

मालेगाव (प्रतिनिधी) मालेगाव तालुक्यातील तलाठ्याला सात हजार रुपयांची लाच घेताना अटक,  सजा वनपट येथील तलाठी अनंता अशोक वायाळ याला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका शेतकऱ्याला कॅनरा बँकेकडून कर्ज मंजूर झाले. या पीक कर्जाच्या बोजाची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी वायाळ याने शेतकऱ्याकडे ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (अँटी करप्शन ब्युरो) या बाबत तक्रार केली. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो तर्फे सापळा रचण्यात आला. त्यानुसार दहिदी येथील तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी लाच घेण्याचे ठरले, त्यानुसार वायाळ याने शेतकऱ्याकडून सात हजार रुपयांची रक्कम स्विकारली. त्याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने वायाळ याला रंगेहाथ पकडले. त्यानुसार तलाठी वायाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अँटी करप्शन ब्युरो पुढील तपास करीत आहे, लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा असून जर कोणताही शासकीय सेवक कोणाकडे लाच मागत असेल तर त्याची तक्रार नागरिकांनी 1064 टोल फ्री क्रमांकावर करावी असे आवाहन लाचलुचपत विभागातर्फे  करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने