📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

धक्कादायक: जिल्हयात डेल्टा व्हेरीयंटचा शिरकाव 30 रूग्ण आढळल्याने चिंता वाढली!

नाशिक : कोरोनाच्‍या अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या  डेल्‍टा व्‍हेरियंटचा जिल्‍ह्यात शिरकाव झाला आहे. 
दुसरी लाट ओसरत असतांना जिल्‍ह्‍यात डेल्‍टा व्‍हेरियंटचा शिरकाव झाला आहे. या व्हेरियंटचे ३० रुग्ण आढळले असून, 
प्रयोगशाळेत पाठविलेल्‍या १५५ नमुन्‍यांपैकी ३० नमुन्‍यांमध्ये डेल्‍टा व्‍हेरियंट आढळला आहे. यात नाशिक ग्रामीणमधील २९, नाशिक महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे. यापैकी २९ नाशिक ग्रामीणमधील आहेत, दरम्‍यान प्रशासकीय यंत्रणा सावध झाली असून, आवश्‍यक खबरदारी घेतली जाते आहे
 कोरोना बाधितांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे आरोग्‍य यंत्रणेवर ताण निर्माण झाला होता. . खबरदारीचा उपाय म्‍हणून आरोग्य विभागाचा चमू या रुग्णांवर उपचार करत आहे. त्‍यांच्‍या वैद्यकीय स्‍थितीवर लक्ष ठेवतांना, संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींचा शोध घेतला जातो आहे.जगभरात आव्‍हान ठरत असलेला डेल्‍टा व्‍हेरियंटपासून जिल्‍हावासीय अद्यापपर्यंत बचावलेले होते. परंतु आता जिल्‍ह्यातील रुग्‍णांच्‍या नमुन्‍यात व्‍हेरियंट आढळून आल्‍याने प्रशासकीय यंत्रणेचीही चिंता वाढली आहे. करोना पॉझिटिव्‍ह आढळलेल्‍या १५५ रुग्‍णांचे नमुने 'एनआयव्‍ही'कडे उत्तरीय तपासणीसाठी पाठविले होते. त्‍यांचे अहवाल शुक्रवारी (ता.६) प्राप्त झाले.
 सिन्नर, निफाड, नांदगाव, चांदवड या तालुक्यांतील कोरोना बाधितांच्‍या नमुन्‍यात डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. लसीकरण न झालेल्‍या रुग्‍णांना या व्‍हेरीएंटपासून अधिक प्रमाणात धोका असल्याचे बोलले जात आहे. एनआयव्‍हीकडे पाठविलेल्‍या १५५ नमुन्‍यांच्‍या तपासणीअंती ३० रुग्‍णांच्‍या नमुन्‍यात डेल्टा व्‍हेरीएंट आढळून आला आहे.

डेल्टा प्लस नेमका काय आहे?

डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा 'बी 1.617.2' याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.

 हे रुग्‍ण वैद्यकीय निगराणीत असून, प्रशासकीय व आरोग्‍य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरीकांनीही कोरोनाविषयक उपाययोजनांचे काटेकोर पालन जबाबदारी पार पाडावी.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.
Courtesy: Esakal

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने