📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

येत्या 2 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मालेगाव (जय योगेश पगारे ) येत्या 1 ते 2 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता आज राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

येत्या १ ते २ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी  मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात उत्तर,  मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि संपूर्ण राज्यभर ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने