: प्रांताधिकारी डॉ.शर्मा*
*मालेगाव, दि. 09 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा):* तालुक्यातील मौजे निमगाव खु. अजंग, येसगाव बु. व ज्वार्डी बु. येथील अंदाजे 185 ब्रास वाळुसाठा हा राज्य स्तरीय दक्षता पथक नाशिक यांनी जप्त केला आहे. या जप्त केलेल्या वाळु साठ्याचा लिलाव गुरुवार 12 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मालेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या वाळुसाठ्याच्या लिलावात इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
वाळुसाठ्याची हातची किंमत रुपये 3 लाख 60 हजार 380 पेक्षा अधिक बोलीने जाहिर लिलावास सुरुवात करण्यात येणार असून या लिलावात सहभाग घेणाऱ्यांनी प्रथम वाळु साठ्याची पाहणी करावी. त्यानंतर वाळुच्या गुणवत्तेत बदल व जाहिरनाम्यात नमुद वाळुसाठ्या बद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस अनामत रक्कम रुपये 10 हजार इतकी लिलाव सुरू होण्यापुर्वी 1 तास अगोदर रोख स्वरुपात जमा करावी लागेल, व लिलाव संपले नंतर सदर रक्कम संबंधितांना परत मिळेल. लिलावात सर्वोत्तम बोलीची रक्कम व वाळु लिलावाच्या सर्वोच्च बोलिवर 2 टक्के टिसीएस अधिक 10 टक्के डिएमएफ लिलावधारकास लागेल, तर ही रक्कम सात दिवसाच्या आत भरणा करणे बंधनकारक राहील. अन्यथा लिलाव रद्द समजण्यात येईल. असेही प्रातांधिकारी डॉ.शर्मा यांनी कळविले आहे.
सदर वाळुसाठ्याची विहीत मुदतीत उचल करणे संबंधितास बंधनकारक असून, लिलावातील विक्री केलेल्या वाळु बद्दल काही अपवादात्मक वाद निर्माण झाल्यास त्याची सुनावणी केवळ मालेगाव कोर्टातच होईल. तर कुठलेही कारण न दाखविता सदर लिलाव मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार हा उपविभागीय अधिकारी, मालेगाव यांनी राखून ठेवल्याचेही डॉ.शर्मा यांनी नमूद केले आहे.