📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महापालिकेचे आयुक्त पदी संजय दैने यांची नियुक्ती

🛑 *मालेगाव महापालिकेचे आयुक्तपदी संजय दैने*

राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांमध्ये अलीकडेच आयएएस म्हणून बढती मिळालेल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असून गोंदिया जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने यांची बदली मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

तसेच इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या

०१. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.

०२. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.

०३. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.

०४. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

०५. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

०६.  कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

०७. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

०८. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

०९. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

१०. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

११. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

१२. रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

१३. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.

१४. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर

सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

कौशल्य विकास विभाग, नवी मुंबई येथील आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली मंत्रालयात उद्योग विभागाच्या सहसचिवपदी झाली आहे. तर पालघर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष नीलेश गटणे यांची बदली नांदेड महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे.


अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांची बदली सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण मुंबई या पदावर तर पी. डी. मलिकनेर यांची सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी झाली आहे. सुरेश जाधव यांची नेमणूक कामगार आयुक्तपदी तर प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे येथे झाली आहे.


कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांची नियुक्ती अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे.


एस. जी. देशमुख अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर, एम. देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे येथे झाली आहे.राहुल कर्डिले यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे तर जी. एस. पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने