मनमाड (जय योगेश पगारे) मनमाड शहरातील पांडुरंग नगर येथे दोन महिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या दोन्ही सासु-सुन असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील पांडुरंग नगर येथे असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या गयाबाई अशोक पवार ( वय ५०) ह्या पाय घसरून विहरीत पडल्या. गयाबाईने केलेल्या आरडाओडमुळे त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मनिषा सचिन पवार ( वय २६ ) हिचा तोल जाऊन विहरीत पडल्या. मात्र या दोन्ही महिलांना पोहता येत नसल्याने आपला जिव वाचवता आला नाही. दुर्दैव असे की आज सचिन पवार याचा वाढदिवस असुन आई आणि पत्नीला गमवल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली असून पुढील तपास एपीआय गौतम तायडे करीत आहे
Tags
death