धुळे (सचिन पगारे ) मध्य प्रदेश राज्यातून गावठी कट्टे खरेदी करून राजस्थान राज्यात विक्रीसाठी घेऊन जाणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक २२/०७/२०२१ रोजी १८.२० वाजेचे सुमारास स्था.गु.शा. चे पो. निरी. श्री. शिवाजी युवत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चोपडा येथून दोन इसम स्कॉर्पिओ वाहन क्र. जी. जे. ०८ बी.बी. ५०६९ मध्ये अवैधरित्या अग्नीशस्त्रे घेवुन दोंडाईचा मार्ग राजस्थान कडे जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली, सदर बातमीची खात्री करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिंदखेडा पोलीस ठाणे हद्यीत चिलाणे गावाचे परीसरात सापळा लावला असता, स्कार्पिओ क्र. जी.जे. ०८ बी.बो. ५०६९ हि शिंदखेडा कडुन दोंडाईचा कडे दिनांक २३/०७/२०२१ रोजी सकाळी ०६.३० वाजता जात असतांना सदर पथकास दिसली. पथकाने अडथळा करुन सदर स्कार्पिओ थांबविली असता, स्कार्पिओ मधी दोन इसम हे पथकास पाहताच पळुन जाऊ लागले त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता, त्यांनी त्यांची नांवे १) कंवराराम केसाराम जाट वय २७ धंदा मजुरी रा. १३५ अनादनी गोदारी को ढाँणी, कोशले की ढाँणी तहसिल गुडामालानी जि.बाडमेर (राजस्थान) २) विक्रमसिंग भवरसिंग राजपुत वय २१ रा. राजपुतो की ढाँणी, सावरसर तहसिल शेरगढ़ जि.जोधपुर (राजस्थान) असे सांगितले तदनंतर त्यांना विचारपुस केली असता त्यांनी त्यांचेजवळ अथवा त्यांचे ताव्यातील स्कार्पिओमध्ये अग्नीश नसल्याचे सांगितले. परंतु मिळालेली खवर ही खात्रीशिर असल्याने स्कार्पिओ व त्यातील वर नमुद दोन् इसमास ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले. तदनंतर स्कार्पिओची मॅकेनिकलच्या मदतीन बारकाईने झडती घेतली असता, ड्रायव्हर शिटच्या खाली चेसीसमध्ये तयार केलेल्या कप्यामध्ये खालील प्रमा मुझेमाल मिळुन आला,
१) ४४,०००/- रु. किंमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह
२) १२,०००/- रु. किं. एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह
३) ३,०००/- रु. किंमतीची एक स्टिल बॉडी असलेली मॅगझीन
४) १६.०००/- रु. किंमतीचे एकुण १६ जिवंत राऊंड (काडतुस)
असा मोबाईल, स्कार्पिओसह ६,०१,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपी विरु शिंदखेडा पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोप यांनी ज्याच्याकडून पिस्टल खरेदी केले आहे त्याचा शोध सुरु असुन यापूर्वीही नमुद आरोपोतांन राजस्थानमध्ये पिस्टल विक्री केली असल्याचे शक्यता आहे त्यादृष्टीकोणातुन आरोपीकडे विचारपुस चाट
सदरची कारवाई श्री चिन्मय पंडित पोलीस अधीक्षक,धुळे व श्री प्रशांत बच्छाव,अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत
पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोहेकाॅ/प्रकाश सोनार, पोहेकाॅ/संजय पाटील,पोना/संदीप सरग, पोना/कुणाल पानपाटील, पोना/उमेश पवार, पोकाॅ/विशाल पाटील, चापोहेकाॅ/कैलास महाजन,आदींनी केली